संघातून का वगळले हे कळालेच नाही : केदार जाधव

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिका

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंच्या निवडीवरून वाद होणे हे सध्या काही नवीन राहिले नाही. मुरली विजय, हरभजन सिंग यांसारखे खेळाडू निवड समितीवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता केदार जाधवच्या चाहत्यांनी देखील त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत केदारला का स्थान दिले गेल नाही याची अनेक माध्यमांच्या आधारे विचारणा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या आगामी तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यात निवड न झाल्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने निवड समीतीवर टिका करताना संघात कोणत्या कारणास्तव निवड झाली नाही हे कळालेच नाही असे वक्तव्य केले आहे. तसेच मला कोणतीही पूर्वकल्पना न देता संघातून वगळण्यात आले आहे, असेही केदार जाधवने यावेळी सांगितले.

निवड समितीशी संघ निवडी बाबत काही चर्चा झाली का? असे केदारला विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना केदार म्हणाला की माझी संघात निवड झालेली नाही, हे मला माहिती नव्हते. मला हे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींकडूनच समजले. संघातून मला वगळण्यामागे कोणते कारण आहे, हे मलादेखील जाणून घ्यायचे आहे. पण सध्या मी रणजी करंडकात खेळण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केदारला न निवडण्या मागील गूढ उलघडले आहे. त्यांनी सांगितले की, केदार जाधव जाधवच्या तंदुरुस्तीचा इतिहास पाहता आम्ही त्याला संघात निवडले नाही. तो तंदुरुस्त होऊन संघात परतला के लगेच त्याच्या तंदुरुस्तीचे समस्या नव्याने पुढे येते. आम्ही पाहणार आहोत की जर “भारत अ’ संघ ही जिंकला तर त्यात त्याची तंदुरुस्ती कशी राहते. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)