व्यासपीठावर राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे ‘केसीआर’यांची ममतांच्या सभेला दांडी 

हैदराबाद : तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे येत्या १९ तारखेला तृणमूल काँग्रेस आयोजित कोलकात्यातील सभेला दांडी मारणार आहेत. तृणमूल काँग्रेसने कोलकात्यामध्ये विरोधकांची सभा आयोजित केली असून या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी यांच्या हजेरीमुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मात्र ममतांच्या या सभेला गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. तेलंगणामध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने आत्मविश्वास द्विगुणित झालेले केसीआर सध्या राष्ट्रीय पातळीवर ‘ना काँग्रेस – ना भाजप’ अशी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

१९ जानेवारी रोजी कोलकाता येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभेत केसीआर यांची उपस्थिती असेल काय? असा प्रश्न टीआरएसचे लोकसभा प्रतिनिधी बी विनोद कुमार यांना विचारला असता त्यांनी, “केसीआर यांना तृणमूलने निमंत्रण पाठवले आहे की नाही याबाबत मला माहित नाही परंतु जर राहुल गांधी व्यासपीठावर असणार असतील तर केसीआर नक्कीच अशा कोणत्याच सभेला उपस्थिती लावणार नाहीत. हे मात्र नक्की.” असे उत्तर त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)