केबीसी 10 : आसामची ‘ही’ महिला बनली या पर्वाची ‘पहिली करोडपती’

नवी दिल्ली – टेलिव्हिजनवरील  ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय मालिकेच्या दहाव्या पर्वात करोडपती होणारा पहिला स्पर्धक मिळाला आहे. दरम्यान माध्यमाच्या रिपोर्टनुसार आसामच्या बिनीता जैन हिने बंपर प्राईज जिंकले आहे.

चार सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मालिकेच्या पर्वात अद्याप कोणत्याच स्पर्धकाने 1 कोटी रूपये  जिंकले नव्हते, मात्र अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार आणि प्रोमोनुसार आसामची बिनीता जैन हि महिला यशस्वीरित्या  एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. दरम्यान प्रोमोमध्ये त्या महिलेने 7 कोटी रूपयासाठी अखेरच्या प्रश्नाचे उत्तर दिले की नाही हे मात्र दाखविण्यात आलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिनीता जैन हिने 7 कोटीच्या प्रश्नांचे उत्तर दिले की नाही हे प्रेक्षकांना 2 आॅक्टोबरच्या कौन बनेगा करोडपतीच्या भागात कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)