बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने करीना कपूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या एका प्रसिद्ध टॉक शोवेळी ती सांगितले.
या टॉक शो वेळी कतरिनाला विचारण्यात आले की तुला संधी मिळाल्यास तू कोणत्या कपूरसोबत काम करशील. या प्रश्नाला विनाविलंब उत्तर देत तिने करीना कपूरचे नाव घेतले. ती म्हणाली, मी करीनासोबत काम करू इच्छिते. मला वाटते की ती खूपच सहज आणि सुंदर आहे.
तर तु कोणासोबत आयटम सॉंग करणार असे विचारले असता तिने दीपिका पादुकोणचे नाव घेतले. कतरिना म्हणाली, दीपिका उत्कृष्ट डान्सर आहे. जेव्हा ती डान्स करते, तेव्हा तिची स्टाइल खूपच इंट्रेस्टिंग असते. ती खुपच ग्रेसफुल वाटते, असे कतरिनाने सांगितले.
दरम्यान, रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपवरून कतरिना आणि दीपिका यांच्यात अनबन असल्याची चर्चा होती. या दोघी दिर्घकाळ एकमेकींशी बोलत नव्हत्या. त्यानंतर जेव्हा कतरिनाचे रणबीरशी ब्रेकअप झाले, तेव्हाही दोघींमधील वाद समोर आला होता.