‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर कतरिना

कतरिना कैफ सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चाहत्यांमध्ये तिच्या सौंदर्यांची आणि डान्सची क्रेझ पाहायला मिळते. कोणत्याही आऊटफिटमध्ये ती आत्मविश्वासाने वावरताना दिसते. त्यामुळेच ‘वोग’ या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या डिसेंबरच्या अंकाच्या कव्हरपेजवर ती झळकली आहे. यात तिचा बोल्ड तसेच स्टाईलीश लूक चाहत्यांनाही घायाळ करेल. तिचे कुरुळे केस चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत, कारण “भारत’ चित्रपटातही ती कुरुळ्या केसांवरच पाहायला मिळणार आहे.

अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅटरिना, सलमान खान, आणि अली अब्बास जाफर या तिहेरी जोडीने मागच्या वर्षी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. आता ‘भारत’च्या निमित्ताने पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ,सुनिल ग्रोव्हर, दिशा पटाणी हे कलाकारही झळकणार आहेत. पुढच्या वर्षी ‘ईद’च्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होईल. कतटरिनाचा ‘झिरो’ चित्रपटही 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा यांच्यासोबत कॅटरिनाची देखील ‘झिरो’ मध्ये महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)