रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’मध्ये कतरीना कैफ?

डायरेक्‍टर रोहित शेट्‌टी याने पोलिसांवर आधारित बनविलेल्या चित्रपटांना बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. यात अजय देवगणचा “सिंघम’ आणि रणवीर सिंहचा “सिंबा’सारखे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आता रोहित आणखी एकदा अक्षय कुमारसोबत “सुर्यवंशी’ चित्रपट निर्मितीच्या तयारीत आहे. यात अक्षय पोलीस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच चित्रपटातील नायिकेबाबत चर्चा सुरू झाली होती. आता या चित्रपटात अक्षयसोबत कतरिना कैफची जोडी झळकणार आहे. चित्रपटाच्या कास्टसाठी जवळ-जवळ कतरिनाला निश्‍चित मानले जात आहे. यापूर्वी ही जोडी “वेलकम’, “तीस मार खान’, “सिंग इज किंग’, “दे दना दन’, “हमको दीवाना कर गए’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

चित्रपटातील मुख्य नायिकेसाठी रोहित शेट्‌टीने दुसरे नाव विचारत घेतले होते. पण अक्षय कुमारने कतरिनाची शिफारस केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या निमित्त प्रदर्शित करण्यात येणार आहे. जर असे झाल्यास सलमान खान आणि आलिया भट्‌ट यांच्या “इंशअल्लाह’ चित्रपटाशी क्‍लॅश होईल.

दरम्यान, अक्षय कुमार याने वीर सूर्यवंशी म्हणून रणवीर सिंहच्या “सिंबा’मधून कॅमियो केले होते. तसेच अक्षयच्या “सुर्यवंशी’मध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंह हे पाहुणे कलाकार म्हणून काम करणार आहेत. सध्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू असून लवकरच शूटिंग सुरू होणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)