“भारत’ च्या सेंटवर कतरिना जखमी

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या सेटवर एका स्टंटदरम्यान कतरिना कैफ जखमी झाली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे तिला शूटिंग करणे कठिण झाले आहे.
एका माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “भारत’चा एक ऍक्‍शन सीन शूट करताना कतरिनाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.कतरिनाला पूर्णपणे बरी व्हायला आणखी काही दिवस लागणार आहे. तूर्तास तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. पण कतरिनाने शुटिंग सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजते आहे.

कतरिनाने काही प्राथमिक औषधोपचारांनंतर शुटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या प्रकृतीला झेपेल असेच शुटिंग सध्या सुरु ठेवण्यात येणार आहे, असे डायरेक्‍टर अली अब्बास जाफरीने ठरवले आहे. ‘भारत’ चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यात सलमान खानच्या विविधांगी रूपे पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानची नौदलातील अधिकाऱ्यापासून सर्कसमधील स्टंटमॅनपर्यंतची झलक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)