“भाईगिरीला आवरा’ काटेवाडी, भवानीनगरात प्रस्थ वाढल्याने परिसर बनतोय अशांततेचा टापू 

सर्वच घटकांना ठरतेय डोकेदुखी

भवानीनगर: काटेवाडी (ता. बारामती) , भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात वर्चस्वासाठी तरुण मुले टोपण नावे विविध ग्रुप काढून भाईगिरी करीत आहेत. याच वर्चस्ववादातून कलह, गर्दी मारामारी करून दहशत माजवित असल्याने काटेवाडी, भवानीगर अशांत टापू बनू लागली आहेत. गुन्हेगारीवरील यंत्रणेचा धाक काही अंशी कमी होऊ लागल्याने “भाईगिरीं’च्या कारनाम्याची झळ सर्वच घटकांना डोकेदुखी ठरू लागली आहे. परिणामी, “भाईगिरीला आवरा’ अशी हाक देण्याची वेळ आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या काटेवाडी, भवानीनगर परिसरात टुकार फिरणाऱ्या तरुणांमध्ये नवीन टोपण नवे धारण करून परिसरात दहशत निर्माण करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यात हे तरुण हिंदी चित्रपटात धारण केलेल्या डाकुंच्या नावे या ग्रुपला देत परिसरात भाईगिरी करीत आहेत. हे ग्रुप चौकाचौकात मोठे फ्लेक्‍स लाऊन वाढदिवस साजरे केले जात आहेत तर वाढदिवसाचा केक कापून परिसरातील शांतता भंग करून परिसरात दहशत माजवीत आहेत. दरम्यान, हे तरुण असे ग्रुप काढून सामाजिक काम करण्याच्या बाजूला ठेऊन हे तरुण आपली ताकद दहशत निर्माण करण्यासाठी वापरत आहेत.

काटेवाडी, भवानीनगर परिसरातील बसस्थानकावर व बसस्थानकाच्या आवारात विनाकारण स्टंट निर्माण करणे, दुचाकीचा कर्कश आवाज करणे, या ठिकाणी टोळक्‍याने उभे राहून टिंगलटवाळी करणे असे प्रकार होत असल्याने या परिसरातील महिला व मुली यांना बसस्थानकावर थांबणे ही कठीण होत आहे. दिवसेंदिवस आशा घटनांमध्ये वाढ होत असून अजूनही नवनवीन ग्रुप वेगवेगळ्या नावाने बाहेर पडत आहेत. याचा विनाकारण त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींना सहन करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)