VIDEO : जेव्हा प्रभू देवाच्या तालावर कतरिना थिरकते

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटमध्ये सुप्रसिद्ध कोरियोग्राफर प्रभुदेवा यांनी आपल्या अभूतपूर्व कोरियोग्राफीतून ‘सुरैय्या’ गाण्यात कतरीनाला थिरकवले आहे. अभिनेत्री कतरीना कैफने आपल्या इंस्टाग्रामवरून कोरियोग्राफर प्रभुदेवा बाबत सांगितले आहे की, त्यांनी आपल्या अद्वितीय नृत्य कलागुणांचा उपयोग या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी केला असून यामुळे ‘सुरैय्या’ गाण्यातील नृत्य नयनरंजक झाले आहे. एका अर्थाने प्रभू देवाच्या कोरियोग्राफीमुळे ‘सुरैय्या’ गाण्यात जीव फुंकला आहे.

प्रभुदेवाचे ‘मुकाबला’ हे गाणे माझे नेहमीच आवडते आहे. ‘प्रभु प्रत्येक गाण्याला वेगळे रंग आणि ओळख देतो. त्याने माझ्या रिहर्सलवर फार कष्ट घेतले. हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे.’ अशा संदेश तिने इंस्टाग्राम या सोशल साईटवर लिहिला आहे. सोशल माध्यमांमध्ये हा व्हिडियो प्रेक्षकांना भूरळ पाडत असून आतापर्यंत या व्हिडियोला जवळपास ३ लाख लोकांनी  पाहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)