काश्मीरच्या निवडणूका बंगालच्या तुलनेत शांततेत पार पडल्या- नरेंद्र मोदी

बिहार: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये तणावग्रस्त परिस्थिती आहे. काल कोलकातामध्ये अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे झेंडे आणि पोस्टर हटवण्यात आले होते. तसेच काहीदिवसांपूर्वी भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार देखील घडला होता, यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला होता. या परिस्थितीवर नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, “काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांच्या वेळी एकाही निवडणूक केंद्रात हिंसाचार झाल्याचं वृत्त नाही. त्याच वेळी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मात्र मोठा हिंसाचार झाला. माणसे मारली गेली. अनेकांचे घरं त्यांच्या डोळ्यांदेखत जाळली. त्यांना बाजूच्या झारखंड आणि इतर राज्यात पळून जावे लागले. त्यांची चूक एवढीच होती की, ते निवडणुका जिंकत होते”

दरम्यान, त्यांनी ममता बॅनर्जींवर देखील निशाणा साधला. ममता बॅनर्जींना कुणाचाच धाक राहिलेला नाही. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं चॉपर उतरू द्यायला परवानगी नाकारली जाते. आमच्या प्रचारसभा घ्यायला परवानगी दिली जात नाही, यावरून हे स्पष्ट होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)