कश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण 

बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमार याने आपल्या आगामी “मिशन मंगल’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून त्याची चाहत्यांमध्ये खूपच चर्चा रंगत आहे. या चित्रपटातील स्टार कास्टबाबतही चर्चा असून यात अक्षयसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू झळकणार आहेत. आता यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडण्यात आले आहे.

“नरथानासला’ या तेलुगू चित्रपटातून पर्दापण करणारी कश्‍मीरा परदेशी आता बॉलिवूडमध्ये “मिशन मंगल’मधून डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाबाबत कश्‍मीरा खूपच उत्साही आहे. हा कश्‍मीराचा दुसरा चित्रपट आहे. आतापर्यत मराठमोळी कश्‍मीरा ही हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होती. “मिशन मंगल’चे दिग्दर्शक जगन शक्‍ती यांनी कश्‍मीराला आपल्या चित्रपटासाठी दुजोरा दिला असल्याचे समजते.

-Ads-

दरम्यान, “मिशन मंगल’शिवाय अक्षय कुमार हा “केसरी’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या अक्षय कुमार आणि रजनीकांत या दोघा सुपरस्टार कलाकारांचा बिग बजेट असलेला “2.0′ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)