…तर काश्‍मीरचे भारताबरोबरचे संबंध संपतील-मेहबुबा मुफ्ती 

श्रीनगर –  जम्मू-काश्‍मीरला प्रदान करण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाचे जोरदार समर्थन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. दर्जा काढून घेतल्यास जम्मू-काश्‍मीरचे भारताबरोबरचे संबंध संपुष्टात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत अनुकूलता दर्शवणारी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नुकतीच मांडली. त्यावरून मेहबुबा यांनी जेटली यांच्यावर पलटवार केला. जम्मू-काश्‍मीरला राज्यघटनेच्या 370 व्या कलमांतर्गत विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. ते कलम म्हणजे भारत आणि जम्मू-काश्‍मीरमधील पूल आहे. ते कलम रद्द करण्यात आल्यास भारताबरोबर राहण्याचा फेरविचार राज्याला करावा लागेल, असे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)