काश्मीर मध्ये शुकशुकाट

श्रीनगर: कलम ३५-अ विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहितार्थ याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी वेळ दिल्याने काश्मीरमधील अलिप्ततावादी पक्षांनी २ दिवसांच्या बंदची हाक दिली आहे. कलम ३५-अ अनुसार काश्मीर अतिरिक्त देशभरातील इतर कोणत्याही राज्यातील नागरिक काश्मीरमध्ये स्थावर संपत्ती खरेदी करू शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कलम ३५-अ च्या न्यायिक वैधतेविषयी प्रश्नचिन्ह उठवण्यात आले आहे. दरम्यान काश्मीर जॉईंट रेजिस्टंट द्वारे बंदची हाक देण्यात आली असून राज्यभरामध्ये बंदला उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. बंदमुळे काश्मीर मधील जनजीवन ठप्प झाले असून रस्ते, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)