ऐन निवडणुकीत काश्‍मीर बंद 

श्रीनगर – पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या विरोधात विघटनवाद्यांनी आज पुन्हा काश्‍मीर बंदचा पुकारा केला. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. श्रीनगर मधील बहुतेक सारे व्यवहार आज बंद होते. सरकारी वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे.

खासगी वाहने तुरळक प्रमाणात रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. काश्‍मीर खोऱ्यात अन्यत्रही बंदचा मोठा प्रभाव दिसून आला. बंद काळात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्याचेही प्रकार घडले आहेत. हुर्रियत परिषदेच्या नेत्यांनी लोकांना निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. या निवडणूक प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी विघटनवादी संघटनांनी जॉईन्ट रेजिस्टन्स लिडरशीप नावाचा एक महासंघ स्थापन केला आहे. त्यात सय्यद अलिशा गिलानी, मिरवैझ उमर फारूख, मोहंमद यासिन मलिक इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)