करुणानिधी यांची प्रकृती खालावली

चेन्नई- द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती गंभीर आणि अस्थिर झाली आहे. चेन्नईच्या का कावेरी हाॅस्पिटलने सांयकाळी ४.३० वाजता मेडिकल निवेदन प्रसिध्द करत ही माहिती दिली आहे.

हाॅस्पिटलचे डाॅ. अरविंदन सेल्वराज यांनी म्हटले आहे की, मागील काही तासापासून करूणानिधी यांची प्रकृती खूपच खालावली आहे. करुनानिधी यांच्या महत्वाच्या अवयवांची कार्यक्षमता क्षीण झाली आहे. त्याच्यांवर उपचार चालू असताना देखील त्याची प्रकृती खालावतच चालली आहे. करुणानिधी यांची प्रकृती गंभीर आणि अस्थिर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबतची ताजी माहिती समजल्यावर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हॉस्पिटलबाहेर गर्दी करायला सुरुवात केली आहे. रक्‍तदाब खालावल्याने करुणानिधी यांना 28 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)