वयाच्या ९४व्या वर्षी करुणानिधी यांचे निधन

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मावळली.   प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ९४ वर्षीय करुणानिधींनी सुरुवातीला एम जी रामचंद्रन तर नंतर जयललिता या मातब्बर राजकारण्यांशी दोन हात करत तब्ब्ल ६ दशक तामिळनाडूच्या राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला.

करुणानिधींच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत घोषणापत्रात “रुग्णालयातील डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही करुणानिधींनी उपचारांना प्रतिक्रिया न दिल्याने त्यांचे निधन झाले,” असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)