अभिनेता कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट “पती पत्नी और वो’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कार्तिक एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्याने फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. दरम्यान तो एका खिडकीबाहेर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिकचा हा वेगळा अंदाज पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झालेल्या “पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक असणार आहे. त्या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमि, अन्यना आणि कार्तिक हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट जानेवारी 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.