कार्ती चिदंबरम्‌ यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावर आक्षेप 

शिवगंगा – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम्‌ यांचे पुत्र कार्ती यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार एच.राजा यांनी आक्षेप घेतला आहे. कार्ती यांनी उमेदवारी अर्जासमवेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या मालमत्तेविषयीचा तपशील नाही. तो तपशील दडवल्याबद्दल कार्ती यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी राजा यांनी केली आहे.

कार्ती यांना कॉंग्रेसने तामीळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. कार्ती यांच्यामुळे शिवगंगामधील लढत चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाण्यावरच आक्षेप घेत राजा यांनी त्या मतदारसंघात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याचेच सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)