कॉंग्रेसमुळेच कर्तारपुर आज पाकिस्तानात : मोदी

हनुमानगढ (राजस्थान): गेल्या 70 वर्षात पाकिस्तानातील कर्तारपुर साहिब साठी कॉरिडॉर बनला गेला नव्हता. पण तो कॉरिडॉर आज भाजपमुळे बनला असून हे काम कॉंग्रेसला का करता आले नाही असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत बोलताना केला. ते म्हणाले की भारताच्या सीमेपासून केवळ चार किमी अंतरावर असलेले हे शिखांचे पवित्र ठिकाण केवळ कॉंग्रेसमुळेच पाकिस्तानात आहे.

कॉंग्रेसच्या त्यावेळच्या नेत्यांना शिख भाविकांविषयी कोणतीच आत्मीयता नव्हती, त्यांना गुरूनानक देव यांच्या विषयी आदर नव्हता त्यामुळेच कर्तारपुरसाहिब हे शिखांचे ठिकाण पाकिस्तानात गेले असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसने केलेली ही चूक सुधारण्याची संधी मला तुमच्या मतांमुळे मिळाली असे ते म्हणाले. कॉंग्रेस वर टीका करताना ते म्हणाले की पाच वर्षापुर्वी केवळ भ्रष्टाचाराच्या हेडलाईन्स वृत्तपत्रांत छापुन यायच्या तुम्हाला गेल्या पाच वर्षात अशी एक तरी हेडलाईन वाचायला मिळाली काय? असा सवालही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बोलताना ते म्हणाले की या देशातील शेतकरी हा उर्जा देणारा व्हावा अशी माझी इच्छा आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोलर पॅनेल लावावेत, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती तंत्राचा वापर करून उत्पादन वाढवावे अशी सुचनाही त्यांनी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांच्या समस्यांना कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)