जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : करोलिना मारीनने केला सायनाचा पराभव

महिला एकेरीतील माजी नंबर१ खेळाडू  आणि ऑलंपिक  कांस्य पदक विजेती खेळाडू साईना नेहवाल हिचा जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऑलंपिक स्वर्णपदक विजेती खेळाडू कॅरोलिना मारिन हिने  सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

या सामन्यात सुरुवातीपासूनच मरिनचा दबदबा राहिला. तिने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पहिला सेट २१-६ अश्या मोठ्या फरकाने जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये  साईना पुनरागमन करेल अशी अशा होती परंतु ते होऊ शकले नाही. दुसऱ्या सेटमध्ये साईनाने थोडा प्रतिकार केला परंतु हा सेट११-२१ असा गमावत तिने सामनादेखील गमावला.

या स्पर्धेतील पराभवामुळे आता तिचे लक्ष आगामी आशियाई खेळांमध्ये उत्तम कामगिरी करण्यावर असेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)