कर्नाटकच्या श्रीहरी नटराजचा दुसरा राष्ट्रीय विक्रम !

ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धा
पुणे: कर्नाटकच्या जलतरणपटूंनी जलतरणाच्या शर्यतींमध्ये नऊ सुवर्णपदके मिळवताना ग्लेनमार्क 35 व्या सब-ज्युनिअर आणि 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेतील आजचा दिवस गाजवला. कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आज आणखी एका राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात या स्पर्धा चालू आहेत.
आज झालेल्या स्पर्धांमध्ये अनेक चुरशीच्या शर्यती पाहावयास मिळाल्या. 14 वर्षांखालील मुलींच्या 100 मी बॅकस्ट्रोक प्रकारात एसएफआय (महाराष्ट्र) संघाच्या वेदिका अमीनने 2.43.97 ही वेळ नोंदवत आपल्याच संघाच्या करिना शांक्‍ताने सकाळी झालेल्या हीट्‌समध्ये केलेला विक्रम मोडला. करिनाने सकाळी महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ताने 2017 मध्ये पुण्यात केलेला 2.51.94 या वेळेचा विक्रम मोडला होता. सायंकाळी अंतिम फेरीच्या शर्यतीमध्ये मात्र करिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कर्नाटकच्या विधित शंकरने 12 वर्षांखालील मुलांच्या 100 मी ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदकाची कामगिरी केली. आज पार पडलेल्या अन्य शर्यतींमध्ये दिल्लीची भाव्या सचदेव, शॉन गांगुली, कर्नाटकची सलोनी दलाल, गोव्याची नीना वेंकटेश, आंध्र प्रदेशचा थिरधू सामदेव, राजस्थानची सन्वी कुमावत, कर्नाटकचे सुवाना भास्कर, तनिश मॅथ्यू व खुशी दिनेश, तसेच आसामचा ब्रिक्रम चांगमेई यांनी आपापल्या गयांत सुवर्णपदकांची नोंद केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)