कर्नाटकला सर्वसाधारण विजेतेपद, श्रीहरी नटराज, सुवना भास्कर उत्कृष्ट जलतरणपटू 

राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धा 
पुणे: कर्नाटकने सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर अशा दोन्ही गटांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावताना ग्लेनमार्क 35 व्या सब-ज्युनिअर आणि 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कर्नाटकचा श्रीहरी नटराज, तर मुलींच्या गटात कर्नाटकचीच सुवना भास्कर सर्वोत्तम जलतरणपटू पुरस्काराची मानकरी ठरली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत आज झालेल्या शर्यतींमध्ये तीन नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाले. 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये
गुजरातच्या आर्यन नेहराने, 100 मीटर बटरफ्लायमध्ये एसएफआयच्या आर्यन वेर्णेकरने तर 50 मीटर बटरफ्लायमध्ये एसएफआयच्या किआरा बंगेराने नव्या विक्रमांची नोंद केली. या स्पर्धेत सबज्युनिअर आणि ज्युनिअर गटांमध्ये एकूण 37 नवे राष्ट्रीय विक्रम नोंदले गेले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)