#RanjiTrophy : कर्नाटकचा महाराष्ट्रावर 7 गडी राखून विजय

पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकने महाराष्ट्र संघाचा 7 गडी राखून पराभव केला आहे. महाराष्ट्राने कर्नाटकसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आज अखेरच्या आणि चौथ्या दिवशी कर्नाटकच्या संघाने 3 गडी गमावत 184 धावा करत हे लक्ष्य गाठले.

कर्नाटककडून दुसऱ्या डावात सलामीवीर देवदत्त पडिक्कलने 77, डी निश्चलने 61 तर के. अब्बासने नाबाद 34 धावा केल्या. कर्नाटकच्या श्रेयस गोपालने पहिल्या डावात फलंदाजीत 40 धावा केल्या तर दुसऱ्या डावात गोलंदाजीत 4 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.  या कामगिरीबदल श्रेयस गोपालला  सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

-Ads-

संंक्षिप्त धावफलक – 

महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद 113;  कर्नाटक पहिला डाव : सर्वबाद 186.
महाराष्ट्र दुसरा डाव : सर्वबाद 265;   कर्नाटक दुसरा डाव : 3 बाद 184.

कर्नाटक 7 गडी राखून विजयी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)