बेंगळुरू – सन 2018च्या पहिल्या तीन तिमाहीत सर्वाधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव कर्नाटक राज्यात आले आहेत. अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सादर केलेल्या आकडेवारीनुसार सांगण्यात आले आहे. राज्यादरम्यान स्पर्धा निर्माण करण्यासाठी केंद्रसरकारने पुढाकार घेतला आहे. तेंव्हापासून विविध राज्य गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षात बऱ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अमेरिका, युरोप, हॉंगकॉंग आणि ऑस्ट्रेलियाला भेटी दिल्या आहेत. त्यामुळे विविध राज्याकडे गुंतवणूक वाढू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुंतवणुकीत गुजरात-महाराष्ट्राला मागे टाकत ही झेप कर्नाटकाने घेतली असून सुमारे 83 हजार 236 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. एकूण भारतातील गुंतवणुकीच्या 25 टक्के हे प्रमाण असल्याचे नोंदवण्यात आले. गुजरातमध्ये कर्नाटकापेक्षा चार पट अधिक 347 तर महाराष्ट्रात 275 प्रकल्प प्रस्तावित आहेत.
परंतु प्रकल्पाचे मूल्ये पाहता गुजरातमध्ये 59 हजार 089 कोटी रुपये, तर महराष्ट्रात 46 हजार 428 कोटी रुपयाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. भारतात एकूण 3 लाख 38 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. मात्र प्रस्तावित प्रकल्पार्पकी केवळ 6 टक्के प्रकल्प कर्नाटकात आले आहेत. 9 महिन्यांत भारताला 1 हजार 486 प्रस्ताव मिळाले असून यात कर्नाटकात 96 प्रकल्प होणार आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा