कर्नाटकातील सत्तासंघर्षाचा गुरूवारी शेवट होणार ?

बंगळुरू : कर्नाटक सत्तासंघर्षाचा शेवट लवकरच होणार असल्याची चिन्ह पहायला मिळत आहेत. कारण आता मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारविरोधात गुरूवारी म्हणजेच 18 जुलै रोजी विधानसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यानंतर विधानसभेत मतदान होईल. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींचा शेवट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना या दिवशी बहुमत सिद्ध करण्यासाठी शक्तीप्रदर्शन कराव लागणार आहे. या अगोदर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, ज्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जेडीएसला आशा आहे की, बंडखोर आमदार त्यांना साथ देतील व सरकार वाचवण्यास मदत करतील. तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी देखील म्हटले आहे की, चर्चेनंतर विश्वासदर्शक ठरावावर 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. या अगोदर भाजपाने कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे विश्वासदर्शक ठरावासाठी तारीख निश्‍चित करण्याची मागणी केली होती. तर कर्नाटक भाजपा अध्यक्ष येदियुरप्पा यांनी म्हटले आहे की, त्यांना बहुमत प्राप्त करण्याची पुर्णपणे खात्री आहे. मुंबईत असलेले 15 आमदार व दोन अपक्ष आमदार भाजपाला पाठींबा देणार आहेत. शिवाय भाजपाला आणखी दोन आमदारांचा पाठींबा मिळाला आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शक्तीप्रदर्शनादरम्यान पराभव होणार आहे. भाजपाचे आमदार एकत्र आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)