कर्नाटक पोटनिवडणुका निकाल : ‘काँग्रेस-जेडीएस’ यांचा 4-1 ने विजय निश्चित

File photo

फक्त शिमोग्यात भाजपचा झेंडा

कर्नाटक : कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. आज (मंगळवारी) या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेस-जेडीस यांची 4-1 ने विजय निश्चित मानला जात असून भाजपला फक्त शिमोग्यातच विजय मिळविता आला आहे.

बेल्लारी (लोकसभा) मतदारसंघातून काँग्रेसचे वीएस उगरप्पा, मांड्या (लोकसभा) मतदारसंघातून जेडीएस पक्षाचे एलआर शिवरामेगौडा यांनी विजय मिळविला आहे, तर शिमोगा (लोकसभा) मतदारसंघातून भाजपचे बीवाई राघवेंद्र विजयी झाले आहेत.

विधानसभा पोटनिवडणुकीत रामनगरम (विधानसभा) मतदारसंघातून जेडीएस पक्षाचे अनिता कुमारस्वामी विजयी झाले आहेत, तर जामखंडी (विधानसभा) मतदारसंघातून काॅग्रेसचे आनंद सिद्दू न्यामागौडा विजयी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)