कर्जत पोलिसांचा गांजा पिकावर छापा

रवळगाव (ता. कर्जत) : येथील शेतात पिकविलेल्या ओल्या गांजाची झाडे कर्जत पोलिसांनी जप्त केली.

एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

कर्जत – रवळगाव शिवारात गांजाचे पीक घेणाऱ्या शेतावर छापा टाकून कर्जत पोलिसांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

-Ads-

तालुक्‍यातील रवळगाव येथे गांजाचे पीक घेतले जात असल्याची पोलिसांना गुप्त वार्ता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची मोहीम रविवारी पहाटे पोलीस अधिकारी व पथकाने त्या शेतावर धाड टाकली. त्यात त्यांना गांजाचे ओल्या अवस्थेतील पीक आढळून आले. संतोष रामचंद्र खेडकर (वय 45) रा. रवळगाव यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर 58 मध्ये गांजाचे पीक घेतल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी. माने यांच्या पथकाने एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी गांजाचे नमुने तपासणीसाठी घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उद्धव अर्जुन दिंडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या कारवाईमध्ये पोलीस नाईक पांडुरंग वीर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर, अमित बर्डे, जयश्री गायकवाड, इरफान शेख आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)