कर्जतला रेशनवर निकृष्ट दर्जाचे धान्य

file photo

क्रांती सेनेची तक्रार; तहसीलदारांना निवेदन

सोशल मीडियावर महिलांचे गाऱ्हाणे

नेटकेवाडी तसेच धांडेवाडी येथील रेशनच्या धान्यामध्ये होत असलेल्या भेसळीची व्यथा महिलांनी मांडली आहे. तक्रार करूनही संबंधीत दाद देत नाहीत. पुरेसे धान्य मिळत नाही. कुपनमध्ये नाव असतानाही त्या सदस्यांचे रेशन मिळत नसल्याची व्यथा ही महिलांनी मांडली. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमधूनही त्यांच्या व्यथा जनतेसमोर येत आहेत.

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील नेटकेवाडी व धांडेवाडी येथील रेशनकार्डधारकांना खडे-मातीमिश्रीत, भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार क्रांती सेनेने केली आहे. प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन क्रांती सेनेने या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेटकेवाडी तसेच धांडेवाडी येथील रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप होत असल्याचा प्रकार महिलांच्या निदर्शनास आला. दुष्काळी परिस्थितीमध्ये कर्जत तालुक्‍यातील कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र गरीब जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या या धान्यातच भेसळ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्या धान्यातच भेसळ होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

तांदळामध्ये सिमेंटचे खडे व माती आढळत असल्याने ते बाजूला करण्यासाठी महिलांना चांगलीच कसरत करावी लागते. धान्यात होत असलेल्या भेसळीमुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेसळयुक्त धान्याचे नमुनेही सोबत आणले होते.

क्रांती सेनेचे कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, कर्जत तालुकाध्यक्ष सुनील धांडे, उपाध्यक्ष गोकूळ नेटके, संपर्क प्रमुख आशीष देशमुख, युवाध्यक्ष शब्बीर शेख, तालुकाध्यक्ष साजन शेख आदींनी या प्रश्नावर आवाज उठविला. प्रशासन याबाबत काय ठोस भूमीका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)