मंत्रिमंडळ विस्तारासाठी, बाप्पा सद्‌बुद्धी दे!

सिद्धटेक (ता. कर्जत)- येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना सपत्निक माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आदी.

कर्जतमधील सिद्धिविनायकाला एकनाथ खडसे यांचे साकडे

कर्जत – देवा सर्वांना सद्‌बुद्धी दे, असे साकडे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सिद्धिविनायकाला घातले. गुरुवारी त्यांनी कर्जत तालुक्‍यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी असे उत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खडसे यांनी सिद्धटेकच्या सिद्धीविनायकाची विधीवत सपत्निक पूजा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. खडसे यांनी सर्वांना सद्बुद्धी दे असे म्हटले मात्र ही सद्‌बुद्धी नेमकी कोणासाठी? याचे उत्तर मात्र उपस्थितांना मिळाले नाही.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे, स्वप्नील देसाई, डॉ. सुनील गावडे, विनोद दळवी, गोपीनाथ जगताप, बंडा मोरे, सारंग नलगे आदी उपस्थित होते.

तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सिद्धिविनायक मंदिरात कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. विशेष राजकीय टीकाटिपण्णीला बगल देत अर्ध्या तासातच ते परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)