ट्रोल करणा-यांना करिना कपूरचे सडेतोड उत्तर

बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूरही मुलगा तैमूर व पती सैफ अली खानसोबत मालदिवला सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. या ठिकाणचे काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र, तिने बिकनी घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्याने तिच्यासह सैफलाही ट्रोल करण्यात आले. त्याला करिना कपूरने सडेतोड उत्तर दिले.
करिना नुकतीच अरबाज खानच्या “क्विक हिल पिंच’ या नव्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. करिनाला या कार्यक्रमामध्ये तिच्या फोटोंवरील लोकांच्या काही कमेन्ट्‌स वाचून दाखवण्यात आल्या. अनेकांनी या कमेन्टसमध्ये करिनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले होते.

या कमेंटमध्ये तुझी बायको बिकनी घालते, तुला लाज वाटत नाही का? असा प्रश्न करण्यात आला होता. ही कमेन्ट अरबाजने वाचून दाखवताच बेबोच्या चेह-यावरचे भाव बदलले. ती कमालीची संतापली. मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण? तू बिकनी का घातली किंवा हे असे का केले, असे सैफने मला विचारेल, असे आमचे नाते नाहीच.

-Ads-

माझ्यामते, आम्हा दोघांचेही नाते प्रगल्भ आहे. त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी बिकनी घातली असेल तर त्यामागे नक्कीच कारण असणार, असे करिना म्हणाली.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)