वर्किंग वुमन्ससाठी करीना कपूर आदर्श : स्वरा

स्वरा भास्करवर करीना कपूरचा खूपच चांगला प्रभाव पडलेला आहे. करीना कपूर ही वर्किंग वुमन्ससाठी एक आदर्श आहे, असे स्वराचे म्हणणे आहे. एका प्रायव्हेट एफएम चॅनेलवरच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वराने करीनाबाबतच्या आपल्या आदरयुक्‍त भावना व्यक्‍त केल्या आहेत. आपल्या खासगी आयुष्याचा व्यवस्थित आनंद घेत घेतच व्यवसायिक यश मिळवता येऊ शकते. करीनाने हे दाखवून दिले आहे. आपल्या फॅमिली आणि करीअरला करीनाने उत्तम प्रकारे सांभाळले आहे. हे बघून सगळ्या वर्किंग वुमन्सना तिच्याबाबत आदरच आणखीनच वाटला पाहिजे, असे स्वरा म्हणाली.

“वीरे दी वेडिंग’मध्ये स्वरा आणि करीना दोघींनी एकत्र काम केले होते. “वीरे दी वेडिंग’ हा महिलांच्या दृष्टीकोनातून झालेला सिनेमा होता, अशी टीका होत होती. त्यावर ज्या कामाबाबत आपल्याला मान खाले घालावी लागेल, असे करणारच नाही, असे स्वरा म्हणाली. बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेन्ड सुरू आहे. ते पहाता आपल्याला जर मधुबालाच्या बायोपिकमध्ये काम करायला मिळाले, तर आवडेल. जर ऐतिहासिक व्यक्‍तीवर बायोपिक बनवली गेली, तर इंदिरा गांधींचा रोल करायला आपल्याला अधिक आवडेल, असे स्वराने सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)