करीनाकडून प्रियांकाला मोलाचा धडा

प्रियांका चोप्रा बऱ्याच काळापासून विदेशात सक्रिय आहे. तिने हॉलिवूडचे सिनेमे आणि सिरीयलही केल्या आहेत. वर्षातील बहुतेक वेळ ती अमेरिकेतच असते. एवढेच नव्हे तर तिने नवराही तिकडचाच मिळवला आहे. या सगळ्या पाश्‍चात्य जीवनशैलीला अनुसरणाऱ्या प्रियांकाला करीना कपूर-खानने काही मोलाचे धडे सांगितले आहेत. “कॉफी विथ करण 6′ मध्ये दोघीजणी एकत्र आल्या असताना करीनाने प्रियांकाची चांगलीच हजेरी घेतली.

प्रियांकाचे लग्न झाल्यानंतर लगेचच या चॅट शोचे शुटिंग झाले होते. तेव्हा पीसीचे लग्न अगदी ताजेताजे होते. सैफने तुला कोठे प्रपोज केले? असा प्रश्‍न होस्ट करण जोहरने करीनाला विचारला, त्यावर “ग्रीसमध्ये’ असे उत्तर करीनाने दिले. त्यावर प्रियांका थोडी दचकलीच. कारण तिला निकने तेथेच प्रपोज केले होते. याच गप्पांदरम्यान वरुण धवनचा विषय निघाला. वरुण धवन सध्या कोणाबरोबर डेटिंग करतो असे विचारले तर त्याचे उत्तर प्रियांकाला देता आले नाही. त्यावर “तू केवळ हॉलिवूडमधील ऍक्‍टरच्या अफेअरबाबतची माहिती ठेवतेस का? बॉलिवूडमधील ऍक्‍टरबाबत काहीच माहिती नाही का तुला.?’ असा प्रश्‍न करीनाने प्रियांकाला विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रियांका अगदी सर्रास हॉलिवूडमध्ये रमायला लागल्याची दखल करीनाने अशा प्रकारे घेतली. त्यात प्रियांकाला आपले मूळ विसरू नको, असा सल्ला द्यायचा होता, की त्यातून करीनाची आसुया डोकावत होते, कोणास ठाऊक.

करीना आणि प्रियांका दोघींनी बऱ्याच वर्षांपूर्वी “ऐतराज’मध्ये एकत्र काम केले होते. मात्र, त्यानंतर दोघींनी परत कधीही एकमेकींबरोबर काम केले नाही. दोघींमध्ये काही शीतयुद्ध सुरू असल्याचे समजले होते. पण त्याचे खरे कारण प्रियांकाचे हॉलिवूड कनेक्‍शन असावे, असे आता वाटायला लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)