Karanataka Assembly Election: येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बंगळूरू : सुप्रीम कोर्टाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

दरम्यान, बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ १०५ वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी ७ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा भाजपा कसा गाठणार, यासाठीची जुळवाजुळव भाजपाकडून कशी केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)