“करण की कठपुतली’ म्हटल्याने अलिया भडकली

अलिकडेच कंगणा रणावतने एका इंटरव्ह्यूमध्ये अलिया भटला “करणची कठपुतली’ असे संबोधले. अलिया कधीच गंभीर मुद्दयांवर कोणतीही ठाम भूमिका घेत नाही. म्हणून कंगणाने ही शेरेबाजी केली होती. अखेर अलिया भटने या प्रकरणावर आपले मौन सोडले आणि कंगणाला सडेतोड उत्तर दिले आहे. “कंगणाशी मी पर्सनली बोलणार आहे.

मिडीयाशी याबाबत बोलून मला वाद वाढवायचा नाही.’ कंगणा स्वतःच्या बळावर इथपर्यंत प्रगती करून पोहोचली आहे. त्यामुळे आपण कंगणाचा खूप आदर करते. जर चुकून कंगणाला कधी दुखावले असेल, तर त्याबाबत आपल्याला तिच्याशी वैयक्तिक पातळीवरच बोलावे लागेल. पण कंगणाला दुखावण्याचा आपला कधीच इरादा नव्हता, कंगणाला माझ्याबाबत काहीही तक्रार असो, पण तिने इतकी वाईट रिऍक्‍शन द्यावी, असे तिच्याबाबत मी कधीच वाईट बोललेले नाही. असल्याचे आलियाने सांगितले.

कंगणाच्या मते आलियाने स्वतःला सशक्त करायला पाहिजे आणि महत्वाच्या सिनेमांना विशेषतः जे सिनेमे देशासाठी आणि महिलांसाठी महत्वाचे आहेत, त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, असे कंगणा म्हणाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)