शाहरुखविरोधी ट्‌विट लाईक केल्याने करण जोहर गोत्यात

शाहरुख खानच्या विरोधातले एक ट्विट लाईक केल्यामुळे करण जोहर चांगलाच गोत्यात आला अहे. अक्षय कुमारचा “केसरी’चा संदर्भ घेऊन एका चाहत्याने एक ट्विट केले होते. त्यात अक्षय कुमारच्या स्टारडमची तुलना शाहरुखच्या स्टारडम बरोबर केली आणि शाहरुखला चक्क “बी ग्रेड’ अभिनेता ठरवून टाकले होते. या चाहत्याने “केसरी’ची तुलना चक्क “झिरो”बरोबर केली होती. हे ट्विट करण जोहरने लाईक केले होते. त्यावर त्याला शाहरुख फॅन्सनी चांगलेच धारेवर धरले.

शाहरुखचा मित्र म्हणवतो आणि त्याच्याविरोधातल्या ट्विटल लाईक करतो म्हणजे काय ? “आस्तिन का सांप’ अशा शब्दात पब्लिकने करणची खरडपट्टी काढली. एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर “हॅश टॅग अनफॉलोकरण’ नावाने एक कॅम्पेनच सुरू करण्यात आले. फॅन्सनी केलेल्या या ट्रोलमुळे न रहावल्याने त्याने शुक्रवारी माफीही मागितली. हे ट्विट लाईक करण्यामागे काही कारणे कारणीभूत होती, असे तो म्हणाला. आपल्या ट्‌विटर अकाउंटमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. आपोआप फोटो अपलोड होत आहेत. लाईकही केले जाते आहे. त्यामुळे जरा समजून घ्या, असे करण म्हणाला. शाहरुखच्या “झिरो’च्या सह निर्मितीची जबाबदारी करण जोहरने उचलली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)