कलम 377 नुसार समलैंगिकता गुन्हा आहे, त्यामुळे हे कलम कायदेशीर की बेकायदेशीर यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय सुनावला.  ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा महत्वपूर्ण निर्णय गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर बाॅलीवूडमधील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याने ट्विट करत या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. समलैंगिकता हा गुन्हा नाही , समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द झाल्यामुळं खऱ्या अर्थाने देशाला अाॅक्सिजन मिळाला आहे, असे करण जोहरने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अानंद व्यक्त करताना करण जोहरने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘हा एक एेतिहासिक निर्णय..आज मला खूप अभिमान वाटतोय.. समलैंगिकता हा गुन्हा नाही , समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द होणं मानवतेचा विजय आहे. आज खऱ्या अर्थानं देशाला आॅक्सिजन मिळाला आहे’.

करण जोहरनंतर अनेक बाॅलीवूड कलाकारांनी सुध्दा या निर्णयाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)