कराडात पोलिसांनी रोखला बालविवाह

कराड – ओगलेवाडी एमएसईबी मार्गावरील एका मंदिरात बुधवारी (दि. 17) होणारा बालविवाह महिला व बालविकास अधिकारी आणि शहर पोलिसांनी मंगळवारीच रोखला. दरम्यान, दोन्ही बाजूच्या लोकांना समज देऊन रात्री उशीरा त्यांचे जबाब घेण्यात आले.

याबाबतची माहिती अशी, उस्मानाबादनजीकच्या एका गावातील 16 वर्षे 4 महिने वयाची मुलगी आणि मूळ कुर्डूवाडी (ता. माळशिरस, सध्या रा. ओगलेवाडी, ता. कराड) येथील मुलाचा बुधवारी (दि. 17) ओगलेडी एमएसईबी मार्गावरील एका मंदिरात विवाह होणार होता. मात्र, तत्पूर्वीच या विवाहाची खबर महिला, बाल विकास अधिकारी सुजाता देशमुख यांना लागली. त्यांनी विवाहाची पत्रिका मिळवून शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी महिला, बाल विकास अधिकारी सुजाता देशमुख आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून ओगलेवाडीतून मुलाच्या आणि लग्नासाठी येथे दाखल झालेल्या मुलीकडील नातेवाईकांना पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी मुलीच्या वयाबाबत खातरजमा केली असता मुलीचे वय 16 वर्षे 4 महिने असल्याचे स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)