स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिका आघाडीवर

कराड – स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपालिका व महानगरपालिका यांचा महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. यामध्ये कराड नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार असून तशा आशयाचे स्वच्छ भारत अभियान संचालनालय यांच्याकडून पत्र प्राप्त झाले आहे. कराडच्या इतिहासात नोंद होण्यासारखी ही बाब असून याचे संपूर्ण श्रेय शहरातील महिला वर्गाचे असल्याची माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व गटनेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. घनकचरा व्यवस्थापनाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी कराड पालिकेने विविध प्रयत्न केले आहेत. नागरिकांनीही पालिकेच्या या उपक्रमांना सतत प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या माध्यमातून 18 घंटागाड्या, 2 ट्रॅक्‍टर नव्याने कचरा संकलनासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेवून स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने पूर्व तयारी करून काम केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्षे प्रथम आलेल्या इंदोर शहराचा दौराही करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी जपान दौरा केला. या सर्वामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास मदत झाली. तसेच शहरात एक स्वच्छतेची चळवळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले. ुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतल्याने सुकृतदर्शनी शहर स्वच्छ व सुंदर दिसू लागले. घंटागाड्याच्या माध्यमातून ओला व सुका कचरा टाकण्याची सोय झाल्याने 100 टक्के कचरा वेगवेगळा होऊ लागला. लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव व जागृती होऊ लागली. हेवेदावे विसरून स्वच्छतेसाठी लोक एकत्र येऊ लागले, कष्ट करण्याची तयारी निर्माण झाली, हे पालिकेचे खऱ्या अर्थाने यश आहे.

-ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा
-विजनिर्मिती करणारा बायोमिथेनेशन प्लॅन्ट
-सेंद्रीय खतनिर्मितीचा प्रकल्प व शासनाकडून मिळालेला हरित ब्रॅन्ड
-सुक्‍या कचऱ्यावर सात प्रकारे प्रक्रिया
-प्लॅस्टीकचा रस्ते निर्मितीच्या कामात उपयोग
-40 वर्षापासून साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट
-सॅनिटरी लॅन्डफिलची निर्मिती
-जुन्या कचऱ्याच्या ठिकाणी बगिच्याची निर्मिती
-लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता गितांची निर्मिती
-35 अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये तर 15 हायटेक शौचालय
-विविध भिंतीचे रंगकाम व चौकांचे सुशोभिकरण
-कराड अर्बन बॅंक, ऍक्‍सीस बॅंक, सिंडीकेट बॅंकेची मदत
-प्रभात फेरी, स्वच्छता दौड, घंटागाडी रॅली, विविध स्पर्धा, महाअभियान.

 

कराड नगरपालिकेस मिळालेल्या यशामध्ये सर्व शहरवासियांचा मोलाचा वाटा आहे. पालिकेचा गौरव म्हणजे कराडच्या इतिहासात नोंद होण्यासारखे आहे. यामध्ये शहरातील महिलांचे श्रेय मोलाचे आहे. त्यांनी पालिकेकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करून ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानेच पालिकेला पुढील प्रक्रिया करणे सोपे झाले.
जयवंतराव पाटील, उपनगराध्यक्षा

पालिकेने गेल्या दोन वर्षापासून सुरू ठेवलेली स्वच्छ सर्वेक्षणाची चळवळ सातत्याने सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालिकेत कोणीही अधिकारी पदावर असला तरी या प्रक्‍र्रियेत खंड पडू नये यासाठी स्वच्छ सर्वेक्षणचे कामकाज संगणकीकृत करणार आहे. त्यामुळे या चळवळीला आणखीन व्यापक स्वरूप येण्यास मदत होईल.
यशवंत डांगे, मुख्याधिकारी

पालिकेस मिळालेले हे यश म्हणजे टीम वर्कमुळे शक्‍य झाले आहे. सर्व कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केल्यामुळेच आज पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होत आहे, याचा मला अभिमान आहे. शहरातील विविध संघटना व सामाजिक संघटनेच्या सदस्यांचेही पालिकेकडून आभार.
सौ. रोहिणी शिंदे , नगराध्यक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)