Video : कराड शहर, तालुक्यात कडकडीत बंद

मुंडण, भजन, रास्ता रोको, रॅलीमुळे पोलिसांची तारांबळ

-Ads-

कराड (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कराड शहर आणि तालुक्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण करून रास्ता रोको करण्यात आला. कराड येथील प्रीतिसंगमावर नागरीकांनी सामुहिक मुंडण करत शासनाचा निषेध केला. सैदापूर कॅनॉल येथे चार हजाराच्या जमावाने दोन तास विजापूर-चिपळूण राज्यमार्ग रोखला, तर ओगलेवाडी (ता. कराड) येथे आंदोलक जनावरांसह रस्त्यावर उतरले. तसेच रस्त्यावर टायर पेटविले.

पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहने रोखली. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर ठिय्या मारून आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. सकाळी तासवडे टोलनाक्यावर आंदोलकांनी दोन तास ठिय्या मारून भजन केले. त्यानंतर टोलनाका परिसर ओस पडला. ग्रामीण भागातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. कराड विमानतळानजीकच्या राज्यमार्गावर दुभाजकाचे दगड टाकून वाहतुकीला अडथळे आणले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)