कपिल सिब्बल यांचा केसीआर यांच्यावर हल्लाबोल

हैद्राबाद (तेलंगणा): कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज मुख्यमंत्री केसीआर (के. चंद्रशेखर राव) यांच्यावर हल्लाबोल केला. मतदानाच्या दिवशी, म्हणजे 7 तारखेला तेलंगणाचे मतदार केसीआर यांची वृत्तीच बदलून टाकतील असे ते म्हणाले, केसीआर यांनी प्रत्येक प्रकल्पात बदल केले आहेत त्या संदर्भात ते बोलत होते. केसीआर प्रत्येक प्रकल्पात बदल करत आहेत, त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानातही बदल केले आहेत असे मला सांगण्यात आहे, या बदल करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचीच वृत्ती बदलण्याची वेळ आली आहे, अणि तेलंगणाचे मतदार 7 तारखेला ते काम करतील, असे सिब्बल म्हणाले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तेलंगणातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. आणि याचे कारण शालेय शिक्षणाबाबत केसीआर यांच्याकडे कोणतेही धोरण नव्हते. तेलंगणातील 4,000 पेक्षा शाळा बंद करण्यात आल्या आहेत याचा उल्लेख करून कपिल सिब्बल म्हणाले, की विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांब अंतर चालावे लागत आहे. संपूर्ण देशात शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या तेलंगणात सर्वात अधिक आहे, याचाही सिब्बल यांनी उल्लेख केला.
एका सर्वेक्षणानुसार तेलंगणातील अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्जे घेतलेली आहेत. केसीआर यांनी जाहीर केलेली कर्जमाफी योजना केवळ बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असल्याने या शेतकऱ्यांना तिचा काहीही उपयोग नाही.

-Ads-

केसीआर यांनी दिलेले एकही वचन पूर्ण केले नाही, प्रत्येक जिल्हा मुख्यालयात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे त्यांने वचन दिले होते, ते केले का असे त्यांना विचारा. प्रत्येक मतदार संघात 100 बेडचे हॉस्पिटलचे त्यांनी वचन दिले होते. ते केले का विचारा. अशा गोष्टी सांगून तेलंगणातील 19 लाख युवक बेकार असल्याचे सिब्बल यांनी अधोरेखीत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)