कपिल शर्माला विवाहाचे वेध लागले 

गेल्या वर्षभरापासून कपिल शर्मा वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता तो पुन्हा एकदा टिव्ही शोच्या माध्यमातून कमबॅक करतो आहे. त्याचे लग्नही आता ठरले आहे. त्यामुळे त्या दोन महत्वाच्या गोष्टींचे वेध कपिलला लागले आहे. खूप काळापासूनची गर्लफ्रेंड गिन्नी चरतथबरोबर कपिलचा विवाह डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्याचा नवीन शो देखील याच काळात सुरू होणार आहे.

“कमबॅक’ करण्याबाबत त्याला विचारले असता, “कमबॅक करू शकणार नाही, असे वाटायला मी काही गुन्हा केला आहे का. मी काही खून वगैरे केला आहे का ‘ असा प्रतिप्रश्‍नच त्याने केला. आपल्याबाबत गेल्या काही काळापासून बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या. आता त्या चुका सुधारण्याची संधीच त्याला मिळाली आहे. कपिलची होणारी पत्नी गिन्नी खूप अध्यात्मिक आहे. ती खूप पूजा अर्चा करत असते. तिने कपिलसाठी एक अंगठीही मागवली आहे. ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते. डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घेते, त्यामुळे तिचा निर्णय बहुतेक बरोबरच असतो. त्यामुळे जसे गिन्नीची इच्छा असेल, तसेच आपण करणार आहोत, असे कपिलने सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)