कपिल शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार ‘लग्नाच्या बेडीत’

कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळेस कपिलचे चर्चेत येण्याचे कारण त्याचे वैयक्तिक जीवन आहे. कपिल शर्मा लवकरच काॅमेडी शो द कपिल शर्मा शो याव्दारे पुर्नागमन करणार आहे, अशा बातम्या येत असताना आणखी एक बातमी अशी येत आहे की, कपिल या वर्षी म्हणजेच येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समजते आहे.

माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार  कपिल शर्मा हा त्याची गर्लफ्रेन्डं गिन्नी चतरथ हिच्यासोबत डिसेंबर महिन्यांत लग्न करणार आहे. कपिल शर्माच्या जवळच्या मित्राचं म्हणणं आहे की, कपिल शर्मा सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनात खूश आहे. गिन्नी हिच्यासोबत बराच वेळ घालवल्यानंतर कपिलने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान असही समजत आहे की, कपिलच्या कुंटूबातील सदस्यांची अशी ईच्छा आहे की, कपिल याने याचवर्षी लग्न करावे. दरम्यान अजून तरी लग्नाची तारीख ठरलेली नाही मात्र चर्चा अशी आहे की लग्न हे पंजाबमध्ये होऊ शकतं. लग्नाचे सर्व विधीप्रकिया या अमृतसरमध्ये पार पडणार आहेत. लग्नातील वेगवेगळे विधी 4 दिवस चालणार असल्याचं समजतं आहे. तसेच लग्नानंतर कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ मुंबईमध्ये येऊन आपल्या खास मित्रांसोबत ग्रॅण्ड रिसेश्पन पार्टी करणार आहे.

कपिल शर्मा याने मागील वर्षी गिन्नी हिच्यासोबतचे आपल नातं असल्याच मान्य केल होत. त्याने गिन्नी सोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

सध्या कपिल शर्मा त्याच्या पंजाबी प्राॅडक्शनच्या सन आॅफ मंजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ही फिल्म या महिन्यांत म्हणजेच आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)