कपिल देव यांची मुलगी आमिया लवकरच करणार ‘बाॅलिवूड’मध्ये एन्ट्री

बॉलिवूडमधील जान्हवी कपूर, सारा अली खान, वरुण धवन, आलिया भट, अनन्या पांडे या स्टार किडच्या यादीत आता  कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 23 वर्षीय आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. ‘८३’च्या  भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शक कबीर खान घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कबीर खानने सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. तसेच सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत ताहिर भसीन दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)