ध्येय समोर ठेवून वाटचाल करा : कपिल देव 

पुणे : जर ध्येय सुंदर असेल, तर प्रवासाची चिंता कशाला करता? आपण जे काही कष्ट घेत असू, त्यातून मिळणारे यश सुंदर असेल, तर वाटेत येणा-या अडीअडचणींची चिंता कशाला करायची. ते मौल्यवान डेस्टीनेशन डोळ्यापुढे ठेवा आणि मग बघा. तुमचा प्रवासही सुंदरच होईल, असे प्रसिद्ध क्रिकेटपटू कपील देव यांनी म्हटले आहे.

येथील फ्लेम विद्यापीठात विद्यार्थ्यांशी कपिल देव यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डीन फॅकल्टी ऑफ बिझनेस, फ्लेम युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक द्वारिका प्रसाद उनियाल यांनी कपिल देव यांचे स्वागत केले.

-Ads-

विद्यार्थ्यांना संबोधित करताना, कपिल देव म्हणाले, तुम्ही या देशाचे भविष्य आहात! तरुणांकडे ऊर्जा आहे, जी अद्वितीय आहे. तुम्ही काहीतरी मूलभूत असे रचनात्मक काम करा. यश मिळवणे हीच जीवनाची मौलिकता आहे. जीवनात एक आघाडीवर असतो, इतर सगळे त्याला फॉलो करतात. भविष्यात आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या लोकांमध्ये लीडरशिपची चकाकी असते.

विद्यार्थ्यांनी नेहमीच आपल्या शिक्षणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, त्यांच्या जीवनातील पॅशन फायदेकारक असेल, असे सांगून कपील देव म्हणाले की, विद्यार्थी म्हणून मी घालवलेला काळ सोनेरी असून आजच्या विद्यार्थ्यांनीही वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. मात्र, जेव्हा आपण स्कोअर करू शकत नाही तेव्हा नेटवर परत जा आणि प्रॅक्‍टिस करा.

जर तुम्हाला गुण मिळत नाहीत तर अभ्यास करा! आपले गुण तुमची बुद्धी दर्शवत नाहीत. जर तुम्ही पुरेसे परिश्रम घेतले नाहीत, तर तणावग्रस्त आणि दबावाखाली असता! आज विद्यार्थी असलेले उद्या जेव्हा पालक बनतील, तेव्हा त्यांनी आपली स्वप्ने आपल्या मुला-मुलींवर लादू नयेत, असे भावपूर्ण आवाहनही कपिल देव यांनी अखेरीस केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)