कंगणाच्या “मेंटल है क्‍या’ला मानसोपचारतज्ञांकडून आक्षेप

मुंबई – कंगणा रणावत तिच्या “मेंटल है क्‍या’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सिनेमाचा विषय आणि शिर्षकावर “इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटी’ने आक्षेप घेतला आहे. या वादावर यावेळी कंगणाची बहिण रंगोलीने बाजू सांभाळायचे असे ठरवले आहे. तिने कंगणा आणि सिनेमाचा विषय दोघांचाही डिफेन्स करताना एक ट्विट केले आहे. “या सिनेमाबाबत सगळ्यांनाच अभिमान वाटायला पाहिजे. कंगणाने या सिनेमासाठी जो विषय निवडला आहे, यावर खरेतर खूप गहन चर्चा व्हायला पाहिजे. या सिनेमामुळे या चर्चेला सुरुवातच होईल.’ असे रंगोलीने म्हटले आहे. तिच्या या ट्विटपूर्वी “इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटी’ने सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवून शिर्षक आणि विषयावरचा आपला आक्षेप नोंदवला. “मेंटल हेल्थ केअर ऍक्‍ट’ या कायद्याच्या अनेक कलमांचे उल्लंघन या सिनेमातून केले जाते आहे. केवळ शिर्षकामधूनच नव्हे तर सिनेमातल्या तपशीलातूनही मानसिक रुग्णांची नक्कल केली गेली आहे. अजून तरी रंगोलीने यासंदर्भात केलेल्या ट्विटचा काही परिणाम झाल्याचे ऐकिवात नाही. एकता कपूरच्या प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये कंगणा आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)