नवी दिल्ली – चित्रपट सृष्टीतील कंगना राणावत, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक कलाकारांनी आज भारतीय जनता पक्षाला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन जाहीरपणे नरेंद्र मोदी यांना आपला पाठींबा जाहीर केला.
या अगोदर चित्रपट सृष्टीतील सुमारे ९०० कलाकारांनी नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आज विवेक ओबेरॉय, कंगना राणावत, पुनम ढिल्लो, गजेंद्र चौहान, बोनी कपूर, मनोज जोशी, सपना चौधरी आणि कुस्तीपटू खली यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन नरेंद्र मोदी यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या देखील उपस्थित होत्या.
A get together of celebrities and personalities from the entertainment industry, for support to BJP, is underway in Delhi. Wrestler The Great Khali, veteran actor Poonam Dhillon, producer Boney Kapoor and others are present. EAM Sushma Swaraj is also present at the get together. pic.twitter.com/sv3szxxG9d
— ANI (@ANI) May 5, 2019