कंगणा रणावत पुन्हा करणार दिग्दर्शन

सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली कंगणा राणावत गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ते म्हणजेच बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका’च्या दिग्दर्शनामुळे. कंगना या पाठोपाठ आता आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती येत आहे.

दिग्दर्शक क्रिशच्या ‘मणिकर्णिका’मधून एक्‍झिटनंतर दिग्दर्शनाची धुरा कंगनाने सांभाळली. तिचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. कंगना या पाठोपाठच आता के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या आगामी चित्रपटाचेदेखील दिग्दर्शन करणार असल्याचे समजत आहे. सध्या या संबंधीच्या चर्चा पहिल्या टप्प्यात असून यासाठी कंगणा अमेरिकेतून दिग्दर्शनाचे धडेदेखील घेत असल्याचे म्हटले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी “बाहुबली’ आणि “मख्खी’सारख्या वेगळा आशय असणाऱ्या चित्रपटांसाठी विजयेंद्र प्रसाद यांनी काम केले आहे. त्यामुळे हा चित्रपटही इतर चित्रपटांप्रमाणेच खास असणार आहे. दरम्यान ‘मणिकर्णिका’मधील तिचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतून कंगणाच्या चेहऱ्यावरचे करारी भाव पाहायला मिळतात. पारंपरिक दागिगे आणि हातात तलवार घेतलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या रूपात असलेल्या कंगणाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)