कंगणा रणावतने सोनमला सुनावले 

तनुश्री- नाना वाद सुरू असतानाच कंगणा रणावतनेही विकास बहलवर तसाच आरोप केला आहे. विकास बहल आपल्याला घट्ट पकडायचा आणि खूप जवळ यायचा, असा आरोप तिने केला आहे. या आरोपावरून सोनम कपूरने कंगणावर अविश्‍वास दाखवला आहे. कंगणाच्या बोलण्यावर विश्‍वास दाखवता येऊ शकणार नाही, असे सोनम म्हणाली. पण यामुळे सोनम आणि कंगणा यांच्यातच एक कॅट फाईट सुरू झाली आहे. सोनमने आपल्याबाबत असे मत व्यक्‍त करायला नको होते असे म्हणून कंगणाने सोनमची खरडपट्टी काढली आहे.
मला पारखणारी सोनम आहे तरी कोण. कोणत्या महिलेवर विश्‍वास करायचा आणि कोणावर विश्‍वास नाही, याचा निर्णय देण्याचे काही लायसेन्स सोनमकडे आहे का. माझ्या आरोपांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तिला कोणी दिला. मी देशाला अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रतिनिधीत्व केले आहे. माझी ओळख माझ्या वडिलांमुळे निर्माण झालेली नाही. माझ्या स्वतःच्या मेहनतीने मी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, एवढे कंगणाने सोनमला ऐकवले आहे. एवढेच नव्हे तर सोनम ही काही चांगली अभिनेत्री नाही आणि चांगली वक्‍ताही नाही, असे म्हणण्यापर्यंत कंगणाची मजल गेली आहे. अजून तरी कंगणाने केलेल्या आगपाखडीला सोनमकडून प्रत्युत्तर दिले गेलेले नाही.
What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)