कंगणा रणावत चित्रपट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी

कंगणा रणावतची फिल्म “मणिकर्णिका- क्‍वीन ऑफ झांसी’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अनेक घडामोडी घडल्या. सोनू सूदने निम्म्यातून सिनेमा सोडून दिला. काही कारणाने दिग्दर्शक कृष यांनीही डायरेक्‍शनमधून अंग काढून घेतले. या सगळ्या घडामोडींनंतर सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले. पण आता नवीन अडचण उभी राहिली आहे. सिनेमाच्या प्रॉडक्‍शन हाऊसकडून शुटिंगच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे दिले गेले नव्हते. म्हणून या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले.

संप करणाऱ्या कामगारांमध्ये सेट आर्टिस्ट, टेक्‍निशियन आणि डॉक्‍युमेंट वर्कर्सचा समावेश आहे. वेळेवर पैसे न मिळाल्याने “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ आणि मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्मसिटीमध्ये सुरु असलेले “मणिकर्णिका’चे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संपाला कंगणाने पाठिंबा दर्शवला आहे. जोपर्यंत सर्व कामगारांचे पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत “मणिकर्णिका’च्या प्रमोशनच्या कामात आपण सहभागी होणार नाही, अशी भूमिका तिने घेतली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार “मणिकर्णिका’ 26 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. मात्र जर कामगारांचा संप वेळेत मिटला नाही, तर प्रमोशनच्या कामालाही उशीर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)