कंगणाच्या “पंगा’चे शुटिंग भोपाळमध्ये सुरू 

कंगणा रणावतने तिच्या “पंगा’ या आगामी सिनेमाचे शुटिंग भोपाळमध्ये सुरू केले आहे. पुढचे 20 दिवस ती तिच्या वाट्याचे शुटिंग करणार आहे, असे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले. याच काळात “मणिकर्णिका’च्या पोस्ट प्रॉडक्‍शनच्या कामावर देखरेख करण्यासाठीही ती अधूनमधून मुंबईला येत राहणार आहे.

“पंगा’मध्ये कंगणा प्रथमच एक खेळाडू म्हणून दिसणार आहे. राष्ट्रीय कबड्डीपटू राहिलेल्या एका विवाहित युवतीला तिला पाहिजे ते यश मिळू न शकल्याने झालेली तगमग ती यामध्ये दर्शवणार आहे. कबड्डीला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी या युवतीने केलेली धडपड आणि तिचे हे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करताना आलेल्या अडचणींचा परामर्श “पंगा’मधून घेतला जाणार आहे. सिनेमाचे बहुतेक शुटिंग भोपाळमध्येच होणार आहे.

-Ads-

“सुई धागा’ आणि “स्त्री’चे लोकेशनही भोपाळमधीलच होते. याशिवाय भोपाळमध्ये शुटिंग करणे निर्मात्यांना अधिक स्वस्त पडणार आहे. मुंबई किंवा अन्य शहरांच्या तुलनेमध्ये भोपाळमध्ये 20 टक्के कमी खर्च येणार आहे. म्हणूनच आता भोपाळमधील शुटिंगला अन्य निर्मात्यांप्रमाणे “पंगा’ च्या निर्मात्यांनीही प्राधान्य दिले आहे. कंगणाला “मणिकर्णिका’च्या रणभूमीवरून कबड्डीच्या मैदानात उतरायचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)